Saturday, February 9, 2019

बालमनाचा प्रेमार्थ


                                 त्यावर्षी माझ्याकडे ८वी डचा दांडोबा वर्ग होता. ह्या मुलींना अभ्यासात गोडी नव्हती. त्यांना कधी प्रेमाने तर कधी धाकाने शिकवावे लागे. ह्या सर्व वर्गात एकच मुलगी आशेचा किरण होता. तिच्या वह्या व्यवस्थित, भ्यास वेळच्या वेळी केलेला, वागणे व्यवस्थित, घटक चाचण्यात तिला चांगले मार्क्स मिळत. पण पुढे-पुढे तिचे अभ्यासातील लक्ष उडाले की काय?   तिला संगत कोणाची लागलेली आहे का? अशा शंका माझ्या मनात येऊ लागल्या. तिच्याकडे मी जास्त काळजीपूर्वक पाहू लागले. मग माझ्या लक्षात आले की, ल्या सुट्टीनंतर ती मुलगी वर्गात नसते. तिच्या मैत्रिणींनी सांगितले, “शाळा सुटायच्या वेळेस ती शाळेत येऊन, दप्तर घेऊन जाते.”

                                  एके दिवशी मी तिचे दप्तर उचलून कपाटात ठेवले व कुलूप लावले. मुलींना सांगितले की, “ती आली की, मला  भेटावयास सांगा.” शाळा सुटायच्यावेळी, ती मला दप्तर मागू लागली. मी तिला विचारले, “परवानगीशिवाय शाळा सोडून कुठे गेली होतीस?” धी ती दाद देईना. आवाज चढवल्यावर तिने सांगितले, “मावशीकडे”. “कुठली मावशी?” तिने दिलेले उत्तर ऐकून, मला गरगरायला लागले. तिची ती रस्त्यात ओळख झालेली मावशी, वेश्या वस्तीत रहात होती. निरागसपणे ती मुलगी मला सांगत होती,”ती मावशी मला बोलावते. खाऊ देते. खूप लाड करते. तू खूप दमतेस म्हणून तिच्या घरी झोपायला देते.” मुलीचे वय १३-१४ वर्षाचे रंग सावळा पण चेहरा आकर्षक कोणालाही आवडावी अशा ह्या लाघवी मुलीला; प्रेम लावून, ती बाई वाममार्गाला नेण्याच्या प्रयत्नात होती.

                             मी ताबडतोब तिच्या आई-वडिलांना बोलावून सत्य परिस्थिती सांगितली. “तिला रागावू नका नाहीतर मुलगी हातची जाईल. अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही काहीही करा पण तिचे गाव,शाळा, वातावरण सगळे बदला. प्रेमाने तिला समजावून सांगा. तुमची मुलगी बुद्धीने हुशार आहे. तिचे आयुष्य व्यवस्थित मार्गी लावा.”

                              दोन दिवसांनी त्या मुलीचे वडिल मला हसत सांगायला आले, “बाई काही काळजी करु नका. मी माझी बदली करवून घेतली.” वातावरण बदलले. माझी आवडती विद्यार्थिनी सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, ह्याचे मला मानसिक समाधान मिळाले.

    प्रभा आठवले

माजी शिक्षिका - . . हायस्कूल, नाशिक

क्रमशः


Saturday, January 26, 2019

ग. ग. तील प्रजा-सत्ताक


                                सेवानिवृत्त शिक्षिकाह्या नात्यातून मला जाणविते, ती ग. .च्या विद्यार्थिनींची माझ्या मनावरील सत्ता! वास्तविक शालेय जीवनात शाळेचे सत्ता केंद्र मुख्याध्यापिका बाई. एखाद्या जहाजाच्या कप्तानाप्रमाणे, शाळेला योग्य दिशा देण्याचे कार्य करणारा मुख्याध्यापिका हा अधिकारी वर्ग; . . शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत असताना अनुभविण्यास मिळाला. 

                              माननीय सरिता उजागरेबाई सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या पदावर महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ प्रसिद्ध लेखिका सौ. भावना भार्गवेबाई रुजू झाल्या. त्यांनी शाळेतील पहिले उपक्रम तसेच चालू ठेवत, स्वतःच्या कल्पना विविध माध्यमांतून साकारण्याचा प्रयत्न केला. स्वतः प्रतिभासंपन्न लेखिका असल्यामुळे, त्यांनी ग. . तील वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दर महिन्याच्या अखेरीस ४ शिक्षकांनी एखादे नावाजलेले पुस्तक सखोल अभ्यास करुन, त्यावर परिसंवाद सादर करायचा. ह्या उपक्रमातून विद्यार्थिनीना नवीन पुस्तकांची माहिती मिळू लागली तसेच सर्वांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास सुरवात झाली. शाळेत शारदोत्सव सुरु झाला.

                        विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने ग. . आयोजित होऊ लागली. सेंट्रल हॉलमध्ये टी. व्ही. वरील बातम्यांसारखे दैनंदिन घडामोडींवरील बातमीपत्र सादर होऊ लागले. आम्हा शिक्षकांना पुढील आठवड्यांत शिकविण्याचे टाइम टेबल मोठ्याबाईंपुढे सादर करावे लागे. अशी ग. . तील नियोजनबद्ध शिक्षण-व्यवस्था निर्माण करणाऱ्या भार्गवेबाई सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या जागी अत्यंत शांत स्वभावाच्या मोरेबाई विराजमान झाल्या. . . तील सर्व शिक्षक व कर्मचारी व्यवस्थित काम करीत आहेत; हे लक्षात आल्यामुळे असेल,   त्यांनी कोणालाही कसलीच आडकाठी केली नाही. आत्तापर्यंत कडक शिस्तीत तयार झालेला शिक्षक तसेच कर्मचारी वृन्द, सैनिकी शिस्तीत काम करीत होता. शांत स्वभावाच्या आदरणीय मोरेबाई सतत विचारमग्न दिसायच्या. मोठ्याबाईंच्या वैयक्तिक-घरगुती काही अडचणी असाव्यात, असे आम्हाला सतत वाटायचे. त्यामुळेच सेवानिवृत्त  झाल्यावर मोरेबाईंनी लगेच इहलोकाचा निरोप घेतला, असे मला समजले. कारण मोरेबाईंच्या काळात मी सेवानिवृत्त झाले. आमच्या ग. . कुटुंबानी मला दिलेला निरोप समारंभ चिरस्मरणात राहील, असा होता.

                        माझ्या ग. . शाळेतील सेवाकाळात, मला सहकाऱ्यांकडून-विद्यार्थिनींकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्या शाळेच्या १०० वर्षे जुन्या इंग्लिश पुस्तकांच्या लायब्ररीचा चार्ज माझ्याकडे होता. अध्यापनाबरोबर ग्रंथपाल  कामाचा अनुभव मला मिळाला. ह्या लायब्ररीत खूप जुनी, दुर्मिळ पुस्तकांचा अमोल ठेवा होता. काही वेळा मुली वर्गात फावल्या वेळात शिवा-शिवी खेळायच्या. कपाटाच्या काचा फुटायच्या. ह्या कपाटातील पुस्तके सांभाळणे, त्यांच्या नोंदी ठेवणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम. ह्या नोंदी खूप व्यवस्थित ठेवल्यामुळे, सेवानिवृत्तिपूर्वी चार्ज देताना, मला काहीच त्रास झाला नाही की पदरचे पैसे भरावे लागले नाहीत. अंगावर पडलेले काम चोख केल्याने माझे  C.R. कधीच खराब झाला नाही.  

                          आमची ग. . शाळा हे एक कुटुंब होते. कुटुंब म्हटले की, भांड्याला भांडे वाजणारच. काहीवेळा कळत-न कळत मान-अपमान व्हायचे. शक्यतो संघर्ष येऊ द्यावयाचा नाही, टोकाची भूमिका घ्यायची नाही, ही मनाला शिकवण असल्यामुळे संघर्षाचे स्वरुप सौम्य व्हायचे. शाळेतील स्पर्धा, खेळ, स्नेहसंमेलन वगैरेतून आम्ही सर्वजण अमर्याद आनंद मिळवायचो.

                               शिक्षकी पेशातील कठोर शिक्षा म्हणजे पेपर तपासणे, निकाल लावणे. काही मुली अभ्यास करायच्या नाहीत, वह्या नीट ठेवीत नसत, अक्षर गचाळ वगैरे गोष्टी पाहिल्यावर; खूप वैताग यायचा. कधी-कधी नैराश्यातून राजीनामा देऊन बाहेर पडावे, असा विचारही मनात यायचा.

                             मला स्वतःला शिक्षकी पेशाची आवड नव्हती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, माझ्या शालेय जीवनात,   माहेरी बुलढाण्याला आम्ही केसरी पेपर वाचायचो. त्याकाळात आमच्या गावी एक दिवस उशिरा पेपर पोहोचायच्या. केसरीतील द. वि. ताम्हनकर, लंडन ह्यांचकडून हे सदर, मी खूप आवडीने वाचायची. त्या वयात त्या सदरातील मजकुराचे गांभीर्य मला कळत नव्हते. अक्षर-ओळख असल्यामुळे, मला वाचता येत होते. लंडनहून द. वि. ताम्हनकर बातम्या पाठवितात; ह्या गोष्टीचे मला आकर्षण होते. माझे स्वप्न होते, ताम्हनकरांसारखेच आपणही पत्रकार व्हायचे. जीवनात पत्रकार मी बनू शकले नाही.  आमच्या ग. . ची माजी विद्यार्थिनी डॉक्टर वृन्दा भार्गवे (उप-प्राचार्या) एच. पी.टी कॉलेजमधील वृत्तपत्र विभागातील शिक्षणाद्वारे समाजातील भावी पत्रकार समर्थपणे बनवून, मला खूप आनंद देत आहे.

                       आज प्रसार माध्यमांद्वारे ग. . तील आमच्या विद्यार्थिनी सौ. माधुरी गयावळ (सुमंत) तसेच वैजयंती सिन्नरकर ह्यांच्या अप्रतिम कविता खूप समाधान देतात. ह्या कविता वाचताना आठवते ती, कुसुमाग्रजांची मानस-कन्या रेखा भंडारे. महाराष्ट्रातील प्रतिथयश कवयित्री असलेली रेखा भंडारे, शाळेत असताना मोठ्या उत्साहात, मधल्या सुट्टीत, व्हरांड्यात मला गाठून तिच्या स्वतःच्या रचना दाखवायची. आजही ती आमची चिमुकली कवयित्री रेखा भंडारे डोळ्यासमोर उभी रहाते.

                      सौ चित्रा देशपांडे (दर्भे) ही आमच्या शाळेची निगर्वी विद्यार्थिनी. ‘आकारह्या स्वतःच्या संस्थेद्वारे, चित्रा पुण्यातील बाल-कलाकारांना संगीताच्या क्षेत्रात घडवित आहे. कधीही भेटली तर तिचे उपक्रम ती मोठ्या उत्साहात सांगत असते.

                         आमच्या शाळेतील विद्यार्थीनींनी राजकारण, वकील, डॉक्टर, नर्स, इंजिनिअर, चित्रकार, शासकिय अधिकारी, सी. ., अभिनय, उद्योजक, किर्तनकार, गायिका, लेखिका अशा  विविध क्षेत्रात यश मिळविले आहे. आज इतक्या वर्षांनी त्या भेटल्यावर, मधली वर्षे गळून पडतात. जीवनात आत्मविश्वासपूर्ण उभ्या राहिलेल्या आमच्या ग. .च्या मुली पाहिल्यावर, शिक्षकी-पेशाचा अभिमान वाटतो.

                      आजच्या संगणक युगात, शिक्षण-क्षेत्राला आलेली पठारावस्था; संपून उद्याची प्रजा घडविणाऱ्या प्रजा-सत्ताकाची पहाट लवकर उजाडावी, ह्याच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.  

प्रभा आठवले

माजी शिक्षिका, . . हायस्कूल, नाशिक

Wednesday, January 16, 2019

आदरणीय माजी मुख्याध्यापिका सरिता उजागरेबाईंची गुणग्राहकता 




सौ मंजिरी चौधरी (सुमंत) सी. ए. मुंबई ह्यांनी शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवण पाठविली. 
सौ. मंजिरीताईंना मनःपूर्वक धन्यवाद 
समस्त ग ग परिवार, नाशिक


Saturday, January 12, 2019

श्रीमती सरिता उजागरेबाई, माजी मुख्याध्यापिका


                               घड्याळात सकाळचे ११ वाजले होते. एक उंच, धिप्पाड, चष्मा लावलेली, नीटनेटका पोशाख केलेली, केस काळेभो, मानेवर  केसांचे चक्कर, त्यावर गुलाबाचे फुल; रंग काळा पण रुबाबात झाकून गेलेला, अशी व्यक्ती जिना चढून क्लार्कच्या ऑफीसमध्ये आली. क्लार्क मंडळी पहातच राहिली. ही व्यक्ती कोण? त्या व्यक्तीने आपली ओळख दिली. “मी या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून शाळेत रुजू होत आहे.” क्लार्क कंपनी अंधारात होती. त्यांना कोणतीच कल्पना नव्हती; पण वेळेतच सावरुन त्यांनी नमस्कार करुन बसावयास खुर्ची दिली. अशी आमच्या उजागरेबाईंची शाळेतील कारकिर्द सुरु झाली. त्यांचे नाव आम्ही नाशिककर ऐकून होतो. रमाबा ई विद्यालयात त्या Deputationवर मुख्याध्यापिका म्हणून काम पहात असताना कडक शिस्तीच्या बाईअशी किर्ती आम्ही ऐकलेली होती.

                                त्यांनी शाळेतील पूर्वीच्या प्रथा तशाच कायम ठेवल्या. सामुदायिक प्रार्थना, दिनविशेष, वाढदिवस, राष्ट्रीय गीत, महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणे वगैरे उपक्रम मागील पानावरुन पुढे शिस्तबद्ध चालू ठेवले. हळू हळू त्यांच्या कल्पना, विचार विवि उपक्रमांतून प्रगट होण्यास सुरुवात झाली.

                        शिक्षकांनी सिलॅबसप्रमाणे शिकवावे. कामाचे प्लॅनिंग करावे. वह्या व्यवस्थित तपासाव्यात. ध्यापनात नवीन प्रयोग करुन, विषय सुलभ करावा. ह्याबाबतीत त्यांचे धोरण काटेकोर होते. त्याचबरोबर खेळ, क्रिडा, निरनिराळ्या कला, गायन, शिवण, चित्रकला, हस्तकला यांच्या विकासाकडे त्यांचा कल होता.

                          त्यांचा आवाज अतिशय गोड होता. त्या र्माने ख्रिश्चन होत्या. चर्चमधील गाणी सुरेल गात असत. ऐकत रहावसं वाटत असे. त्यांच्या बोटात कला होती. टाकाऊ वस्तूतून टिकावू वस्तू तयार करण्याकडे त्यांचा कल होता. सजावटीवर त्यांचा र होता. आमच्या शाळेतील व्हरांड्यात काचेच्या शोकेस होत्या. त्यात शिक्षकांनी मुलींकडून शैक्षणिक मॉडेल करुन घ्यावीत, ती शोकेसमध्ये लावावीत. तसेच ही Models सतत बदलत रहावीत, ही त्यांची अपेक्षा. ह्या स्वनिर्मितीतून विद्यार्थिनींमध्ये कलेची आवड निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात र पडते.ऑफिसजवळच्या मोठ्या शोकेसमध्ये शाळेला भेट मिळालेले एक दुमजली मोठे घर होते. ते घर सणाप्रमाणे सजवावे लागे. उदाहरणार्थ :- गुढीपाडव्याला घरावर तोरण, फुलांची माळ, साखरेच्या गांठी, छोट्याश्या साडीने सजलेली गुढी नव-वर्षाचे स्वागत करायची. दिवाळीला आकाशदिवा, पणत्या, रांगोळ्या घरासमोर हजर व्हायच्या. ह्या घरातील ख्रिस्तमसही थाटात सजायचा.

                             आमच्या शाळेत वर्षानुवर्षे साजरे होत आलेले वर्गा-वर्गाचे श्रावणी शुक्रवारचे हळदीकुंकू उत्साहात साजरे व्हायचे. आमच्या मोठ्याबाई स्वतः ख्रिश्चन असूनही, पद्धतशीर हळदकुंकू लावून घ्यायच्या. शाळेच्या व्हरांड्यात प्रत्येक वर्गासमोर असलेल्या फळ्यावर निरनिराळ्या प्रकारची माहिती लिहिण्याची प्रथा होती. महिना पंरा दिवसांनी ही माहिती बदलावी लागे. मा. उजागरेबाईंनी ही प्रथा काटेकोरपणे चालू ठेवून  त्यात आणखीन र घातली. प्रत्येक वर्गाने क्रमाक्रमाने गुलमोहर साप्ताहिक चालविण्याचा उपक्रम सुरु झाला. गुलमोहरमध्ये माहिती अत्याधुनिक विषयानुरुप असली पाहिजे. तसेच ती आकर्षक व्हावी, म्हणून गुलमोहर चित्रासह सजविण्यावर मोठ्याबाईंचा र असे.

                        प्रत्येक वर्ग स्वच्छ झाडलेला, बाकांची व्यवस्थित रचना, शिक्षकांची टेबल-खुर्ची योग्य ठिकाणी, फळ्यावर तारीख व सुविचार ह्या सर्व गोष्टी मोठ्याबाईंच्या शिस्तीत होणे अपरिहार्य होते. वर्गाच्या भिंतीवर विषयानुरुप घटकाप्रमाणे आकर्षक तक्ते हवेतच. ते दर महिन्याला बदलले गेले पाहिजेतच, यावर त्यांचा कटाक्ष होता.

                         त्यांच्या सेवाकाळात शाळेला ६०वर्षे पूर्ण झाली. शाळेतील हिरक महोत्सव दणक्यात साजरा झाला. आजी-माजी शिक्षक व विद्यार्थिनींशी संपर्क साधून, त्यांनी शाळेचा इतिहास पाऊलखुणअंकाद्वारे प्रकाशित केला.

                          उजागरेबाईंच्या व्यवस्थापनात प्रत्येक शिक्षकातील गुणांचा योग्य उपयोग करण्यावर र होता. कलागुण असणाऱ्या शिक्षकांचा उपयोग समारंभ साजरा करण्यासाठी त्या करीत असत. कांटेकोर शिस्तप्रिय शिक्षकांना बरोबर घेऊन शाळाबाह्या परिक्षा (S.S.C.,H.S.C.,PSI,Banketc.)पार पाडल्या जायच्या.

                              शाळेतील रुढी- परंपरा उत्तरोतर वावित नेत असताना, मोठ्याबाईंचा सेवानिवृत्तीचा दिवस उगवला.   शैक्षणिक विकासाचे निरनिराळे उपक्रम उजागरेबाईंना थांबवावे लागले. कालाय तस्मै नमः

प्रभा आठवले

माजी शिक्षिका, . . हायस्कूल, नाशिक

Sunday, December 30, 2018

नवी विटी - राज्य तेच


                          मोठ्याबाई (सौ.आशाताई राजदेरकर) दि. ११ सप्टेंबर १९७५ रोजी सेवानिवृत्त झाल्या आणि आमच्या ग. . शाळेवरील ११ वर्षांचा एक छत्री अंमल संपला. ह्या ११ वर्षांच्या सलग कारकिर्दीत राजदेरकरबाईंनी माझी शाळाह्या भावनेतून ग. .ला सतत नंबर१वर ठेवले. राजदेरकरबाई तसेच त्यानंतर आलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी शाळेच्या शिस्तीत कोणतेच बदल न करता, आपल्या नव-नवीन कल्पनांनी शालेय कामकाजात र टाकली.

                          खाजगी शाळांप्रमाणे आमच्या सरकारी शाळेत शिक्षकवृन्दातून मुख्याध्यापक पदोन्नती मिळत नाही. शासकीय व्यवस्थापनात खो-खो चा खेळ चालू असतो. राज्य सरकारच्या यादीतील सेवाज्येष्टतेनुसार आमच्या शाळेत मुख्याध्यापिकांची नेमणूक होत असते. शासकीय खो-खोच्या खेळांत खूपदा आमच्या शाळेतील मुख्याध्यापिकेची जागा रिकामी  असे. शाळेच्या कामकाजात ह्या गोष्टीची उणीव कधीभासू न देण्याचे इंद्रनुष्य पेलले होते; आमच्या सुपरवायझर असलेल्या सौ. शुभांगी (श्रद्धा) जोशीबाईंनी.  

सौ. आशाताई राजदेरकरबाई सेवानिवृत्त झाल्यावर, . .ला लाभले; अतिशय व्यासंगी, हुशार, विद्वान व्यक्तिमत्त्व. . .च्या मुख्याध्यापिका पदी रुजू झालेल्या श्रीमती सुशिला टिळकबाईंचा वेद, उपनिषदे ह्यांचा गाढा अभ्यास होता. सखोल अभ्यास करुन सेंट्रल हॉलमध्ये विविध विषयांची माहिती सांगायच्या. त्यांच्या भाषणांतून खूप काही शिकायला मिळायचे. विषयाशी एकरुप होऊन पोटतिडकीने बोलताना, त्यांचा आवाज त्यांच्याही नकळत इतका मोठा व्हायचा की, माईकलाही रजा घ्यायला हरकत नाही ! हा गमतीचा भाग सोडला तरी एकला चलो रेअसलेल्या ह्या व्यक्तिमत्वास आपला ठसा शाळेवर उमटविण्यास शासनाने वेळच दिला नाही. त्यांच्या अल्प-कालावधीत आमची ५ ते १०वी ची शाळा व नुकतेच सुरु झालेल्या ज्युनिअर कॉलेजची ११वी (शास्त्र, कला,वाणिज्य) व्यवस्थित वाटचाल करीत होती. ११वीची एक विद्यार्थिनी ऐन वार्षिक परीक्षेच्यावेळी आजारी पडली. टिळकबाईंनी जून महिन्यात ह्या विद्यार्थिनीची रीतसर परिक्षा घेतली. एका विद्यार्थिनीसाठी सर्व विषय शिक्षकांनी आपआपल्या विषयांचे पेपर काढले. तिच्या उत्तरपत्रिका तपासून तिला ११वी पास झाल्याची गुणपत्रिका दिली. टिळकबाईंच्या ह्या निर्णयामुळे ह्या विद्यार्थिनीचे वर्ष वाया गेले नाही. टिळकबाईंची लगेचच बदली झाली आणि सौ जोशीबाईंच्या नेतृत्वाखाली आमची शाळा नदीच्या प्रवाहाप्रमाणे दिमाखात वाटचाल करीत राहिली.

                      काही महिन्यांनी अतिशय तरुण, छोटीशी सावळी  मुर्ती मुख्याध्यापिकेच्या जागेवर विराजमान झाली. Direct Recruit झालेल्या सौ. काकणबाई स्वभावाने अतिशय शांत व्यक्तिमत्त्व. कुणाशीही वाईटपणा न घेणाऱ्या ह्या बाईंनी शाळेच्या व्यवस्थापनांत कोणतेच बदल केले नाहीत. शिस्तप्रिय सुपरवायर बाई (सौ. जोशीबाई)काटेकोरपणे शाळा सांभाळत होत्या. शाळेचा प्रत्येक घटक आपली जबाबदारी ओळखून काम करीत होता. सौ. काकणबाईंच्या कारर्किदीत शाळा दिमाखात चालू असताना, राज्यातील शिक्षकांचा मोठा संप झाला. आम्ही सर्व शिक्षक संपावर गेलो होतो. शाळेची सहल बडोदा, अहमदाबाद वगैरे गुजराथमधील ठिकाणी जाणार होती. एक दिवस काकणबाईंचा मला घरी निरोप आला. मुलींची जबाबदारी असल्याने, तुम्ही गुजराथ सहलीला जाण्यास तयार असाल तर शाळेची सहल जाईल अन्यथा ही सहल मी रद्द करणार आहे. शिक्षक-संपातून बाहेर न पडता, शाळेच्या गुजराथ सहलीची जबाबदारी मी पूर्ण केली. जहाजाच्या कप्तानाप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिकेला शाळेची जबाबदारी घ्यावी लागते, हेच खरे.

                    अल्पावधीत सौ. काकणबाईंची बदली होऊन शाळेचा चार्ज खालच्या मजल्यावर असलेल्या ट्रेनिंग कॉलेजच्या प्रिन्सिपॉलबाईंकडे गेला. दोन ठिकाणचा चार्ज सांभाळताना, त्यांनीही शाळेच्या व्यवस्थापनात कोणतेच बदल केले नाहीत. सौ. जोशीबाई आमच्या शाळेची नौका व्यवस्थित वल्हवित होत्या. ह्या प्रिन्सिपॉलबा ईंची बदली झाली. बरेच महिने आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका पद रिकामे होते.

                    जागतिक किर्तीचे गणित तज्ज्ञ श्री. जयंतराव नारळीकर ह्यांचे गावातील एच. पी. टी. कॉलेजमध्ये व्याख्यान होते. सर्व शाळेतील विद्यार्थी हे भाषण ऐकायला कॉलेजमध्ये गेले होते. आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना घेऊन आम्ही सर्व शिक्षिका व शिक्षक ह्या व्याख्यानाला गेलो होतो. व्याख्यान कळण्याइतपत शालेय विद्यार्थ्यांचे वय नव्हते, परंतु जागतिक किर्तीचे एक महान व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष पहायला मिळाले. व्याख्यान संपल्यावर, दिडच्या सुमारास आम्ही सर्वजण शाळेत परत आलो. आल्या-आल्या बातमी मिळाली की, नव्या मुख्याध्यापिका शाळेत हजर झालेल्या आहेत.

                  नव्या मुख्याध्यापिकाबाईंचे आज आगमन आहे’, हे आमच्यापैकी कोणालाच माहित नव्हते. शाळेत फक्त क्लार्क व शिपाई होते. घड्याळात ११ वाजले असताना; एक उंच, धिप्पा, चष्मा लावलेली, नीटनेटका पोशाख केलेली, केस काळेभोर, मानेवर केसांचे चक्कर त्यावर गुलाबाचे फुल, रंग काळा पण त्यांच्या चालण्याच्या रुबाबात तो झाकून गेलेला, अशी व्यक्ती जिना चढून क्लार्कच्या ऑफिसमध्ये आली. क्लार्कमंडळी पहातच राहिली, ही व्यक्ती कोण? त्या व्यक्तीने आपली ओळख दिली, “मी ह्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून शाळेत रुजू होत आहे”. क्लार्क कंपनी अंधारात होती. त्यांना कोणतीच कल्पना नव्हती; पण वेळेतच सावरुन, नमस्कार करुन, त्यांनी बा ईंना खुर्ची दिली. असा आमच्या मोठ्याबाईंचा आदरणीय सरिता उजागरेबाईंचा ग. . तील पहिला दिवस.

क्रमशः

श्रीमती प्रभा आठवले

 सेवानिवृत्त शिक्षिका,

  . . हायस्कूल, नाशिक

Sunday, March 18, 2018




. . गवाक्ष :-
सौ. विमल (वसुमती) मानेबाई (माजी सुपरवायझर - . . हायस्कूल, नाशिक)

                                     पहाटे ५-५॥ ची वेळ होती. आमच्या शाळेची मुलींची सहल सापुताऱ्यास चालली होती. सहलप्रमुख सौ. मानेबाई; त्यांच्या मदतीस आम्ही ३ शिक्षिका व १ शिपाई असे मुलींसोबत चाललो होतो. बसमध्ये मुलींच्या भेंड्या, गाणी, गप्पा, मोठ्याने बोलणे - हसणे अशी मजेत दंगा-मस्ती सुरु होती. सहलीचा आनंद मुक्तपणे लुटणे चालू होते. आता त्यांच्यावर शाळेतील कोणतीच बंने नव्हती. इतक्यात ड्रायव्हरने बसला अचानक ब्रेक लावला. बस थांबली. मुली किंचाळायला लागल्या.

                                         काय झाले?’ एकच प्रश्नचिन्ह उभे राहिले. समोरचे दृश्य पाहून, आम्ही हादरलो. आमच्या सौ. मानेबाईंनी चूपअसे मोठ्याने म्हटले. मुली एकदम शांत. मानेबाई पर्स घेऊन, बसमधून रस्त्यावर उतरल्या. आम्ही शिक्षिका व शिपाई खाली उतरलो. यंकर दृश्य समोर उभे होते. -८ दांडगी-राकट माणसे, काठ्या व कुऱ्हाडींसह बससमोर उभी होती. रस्ता मोठ्या दगडांनी व काट्यांनी अडविलेला होता. आमच्या मानेबाई हाताची घडी घालून त्या लोकांसमोर उभ्या राहिल्या. शांत स्वरांत न घाबरता त्या लोकांना म्हणाल्या,बाबांनो, तुम्हाला काय हवे? आम्ही मुलींना घेऊन सहलीला चाललो आहोत. आमच्या जवळ फक्त जेवणाचे डबे आहेत.”

                                   आमच्या मानेबाईंचा शांत, धीरगंभीर आवाज ऐकून, ते वाटमारी करणारे लोक वरमले. त्यांचा म्होरक्या म्हणाला, “बाई, आम्हाला फक्त १ रुपया द्या. काही न मिळवता रिकाम्या हाताने परत जाणे, आमच्या धंद्याच्या नियमांत बसत नाही.” सौ. मानेबाईंनी त्यांना एक रुपया दिला व आमचा मार्ग मोकळा झाला. काही व्यक्ती आपल्या सात्विक आचार-विचारांतून संकटाला तोंड देतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मानेबाई.

                                मानेबाई आमच्या मुख्याध्यापिका सौ. राजदेरकरबाईंचा उजवा हात. मोठ्याबाईंचे (सौ राजदेरकरबाईंचे) मुलींवर संस्कार करण्यासाठी विवि प्रयोग चालत. त्यांना साथ होती, मानेबाईंची. आम्हा शिक्षिकांमध्ये त्या मिळून-मिसळून वावरत असत. आपल्या मृदुवाणीनी त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या वाणीत मृदुता तर होतीच पण थोडी जरबही जाणवायची. त्यामुळे त्यांनी सांगितलेले काम केलेच जायचे. त्यांनी आम्हा शिक्षकांना बोलावले तर आम्ही पळत त्यांच्यासमोर हजर रहावेही त्यांची अपेक्षा. ‘प्रत्येक व्यक्तीने चपळ राहिले पाहिजे’, हा त्यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन.

                                 सावळा रंग, बोलके डोळे, उंचीला योग्य असा बांधा, टापटिपीने नेसलेली व्यवस्थित साडी व योग्य ब्लाऊज, किंचित कुरळे केस. केसाचे चक्कर घातलेले व खांद्यावर पर्स अशा थाटात मानेबाईंचा शाळेत सर्वत्र वावर असे. कारण त्या शाळेच्या सुपरवायझर होत्या ना ! शाळेतील वातावरण प्रसन्न व शिस्तित राखण्यावर त्यांचा कटाक्ष होता. शाळेचे व्यवस्थापन पहात असल्या तरी त्यांना अध्यापनाचे काम करावे लागायचे. त्या जन्मजात शिक्षक असल्यामुळे, आपले काम चोख करीत असत.

                             शासकीय नियमाप्रमाणे त्यांची बदली झाल्याने त्यांना आमचा निरोप घ्यावा लागला. आमच्या शाळेशी असलेला त्यांचा संबं तुटला; तरी त्यांनी आमच्याशी जोडलेले जिव्हाळ्याचे संबंध अखंड जपले.

श्रीमती प्रभा आठवले

(माजी शिक्षिका . . हायस्कूल, नाशिक)

Sunday, March 4, 2018


. . चे संस्कार रंग :-

                       शाळा चालू झाली - दि १५ जून १९७० - शाळेत प्रवेश करावयाचा म्हणजे व्यवस्थित पोशाख, पर्स, पर्समध्ये पेन, चष्मा, पेन्सिल, खोडरबर, डायरी, ब्लेड, रुमाल, छत्री, पाण्याची छोटी बाटली असा सर्व सरंजाम सांभाळावा लागतो. त्याचबरोबर वेळेचे बं. आता हातावरील घड्याळ ही शोभेची वस्तू राहिली नाही तर वेळोवेळी वेळेचे भान ठेवण्यासाठी, त्याचा उपयोग होऊ लागला.

                          शाळा सकाळी ११:१० ला सुरु शाळेची घंटा घणघणू लागली की शाळेचे आवार विद्यार्थिनी, शिक्षक, शिपाई, कर्मचारी ह्यांनी फुलून जायचे. शाळेची पहिली शिस्त - वेळेच्या आधी ५ मिनिटे हजर राहिलेच पाहिजे.

                             शाळेची सुरुवात सेंट्रल हॉलमधील प्रार्थनेने व्हावयाची. प्रार्थना वाद्य,संगीताच्या तालावर व्हावयास पाहिजे. शिक्षकांसमवेत सर्व वर्गाच्या रांगा, आगगाडीच्या डब्यांप्रमाणे सेंट्रल हॉलमध्ये आपआपल्या जागेवर स्थिर व्हावयास हव्या. प्रार्थना हॉलमध्ये पूर्ण शांतता हवी. आमच्या शाळेची शिस्त फार कडक, कारण मुख्याध्यापिका शिस्तप्रिय. ‘भ्यास एके अभ्याहे त्यांचे धोरण नव्हते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षणह्या दृष्टीकोनातून सर्व उपक्रम राबविले जात होते. प्रार्थनेनंतर वर्गांप्रमाणे दिनविशेष, तिथी, वार, सवंत्सर, मराठी महिना, इंग्लीश महिना, साल, नक्षत्र वगैरे  माहिती विद्यार्थिनी सांगायच्या. मुलींचे-शिक्षकांचे वाढदिवस, शाळेच्या बागेतील फूल देऊन साजरे व्हायचे. वर्तमान पत्रातील घडामोडी, शास्त्रज्ञांची माहिती, नवीन लागलेला शो वगैरे अनंत गोष्टींचा परामर्श, विद्यार्थिनींमार्फत शिक्षकांना घ्यावा लागे. वर्गातील प्रत्येक मुलीचा सहभाग पाळी-पाळीने होत असे. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संबंधांत जवळीक निर्माण होत असे. गुरु-शिष्य संबंध नकळत दृढ व्हावयाचे. आपल्या वर्गाकडे दिलेली कामगिरी उत्कृष्टपणे सादर करण्यात अहमिका लागावयाची.

                        त्यातच श्रीमद् भगवद् गीतेचा १५वा अध्याय, ९वा अध्याय तालासुरांत सामुहिकरित्या म्हटला जायचा. एखादे देशभक्तीपर गीत सर्व शाळेतर्फे बसविण्यात यायचे.

                         अशा लांबलचक कार्यक्रमांच्या पूर्तीनंतर प्रार्थना संपावयाची. सर्व वर्गांनी शिस्तीत परत जावयास हवे. त्यानंतर तासाप्रमाणे अध्ययन-ध्यापन सुरु व्हावयाचे. ल्या सुट्टीच्या ३ तासिका  आधी १०मिनिटांची सुट्टी असायची.

                          ल्या सुट्टीत पोळी-भाजी, भाकरी-भाजीचा डबा खायचा. डब्यात लाडू- चिवडा, मिठाई, बिस्किटे ह्यांना बंदी होती. धू - धून शिक्षकांना डब्यांची तपासणी करावी लागत असे. श्रीमंत-गरीब उच्च-नीच असा आप-परभाव निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक वर्गाने गोल करुन, झाडाखाली डबा खावयास पाहिजे, ही शिस्त.

                           शाळा सुटण्याच्या आधी शेवटचा ९वा तास खेळाचा. शिक्षकांसहित सर्व विद्यार्थिनींनी, शाळेच्या पटांगणांवर खेळलेच पाहिजे, ही शाळेची शिस्त.

                       रोज दुपारी व  शनिवारी सकाळी शाळेच्या वेळात कोणीही बाहेर जायचे नाही. जायचे असल्यास, परवानगी काढावी लागे; अगदी शिक्षकांना सुद्धा.

                       आमच्या मुख्याध्यापिका ह्या एक आदर्श शिक्षिका तर होत्याच त्यात उत्कृष्ट शिक्षण तज्ज्ञ होत्या. ‘शिक्षण म्हणजे संस्कारहा मंत्र त्यांनी कार्यान्वित केला. शाळेत निवडणुका होऊन विद्यार्थिनींचे मंत्रिमंडळ कार्यक्रमाचे व्यवस्थापन सांभाळायचे. लोकशाही कारभाराचे धडे विद्यार्थीदशेत आपोआप मिळायचे. संपूर्ण शाळेची विवि गटांमध्ये विभागणी केली जायची. प्रत्येक गटात ५वी ते ११वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश असायचा. असा हा लहान-थोर मुलींच्या गटांचे एक कुटुंब बनायचे. ह्या गटांमध्ये खेळ, नाटक, जने, कविता कथा-कथन, स्वच्छता, समूहगीत, भावगीत, जने, पुष्परचना, रांगोळी अशा अनंत स्पर्धा व्हावयाच्या. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व, संगीत, नेतृत्व,अनुयायित्व,एकात्मता, सामाजिक बांधिलकी अशा विवि गुणांची जोपासना नकळत व्हावयाची. उत्साही कार्यतत्पर मुख्याध्यापिकेच्या सहवासात शिक्षिकाही आपोआप तयार व्हावयाच्या.

                           शाळेच्या सेंट्रल हॉलच्या भिंती जवळ-जवळ २०० नकाशांनी सुशोभित केलेल्या होत्या. भारतातील तसे महाराष्ट्रातील पिक-पाणी, लोकवस्ती, नद्या, खनिजे, प्रसिद्ध शहरे ह्यांचे आकर्षक नकाशे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींच्या सहाय्याने शिक्षकांनी तयार करुन घेतले होते. हंसत-खेळत चालता-बोलता तिहास-भूगोल सदैव शाळेच्या नजरेसमोर उभा राहिला.

                               एवढे प्रचंड उपक्रम राबवीत असताना, शालेय अभ्यासक्रम कुठेही मागे राहिले नाहीत. स्कॉलरशिप ७वी च्या परिक्षेसाठी हुशार मुलींची तयारी शिक्षक शाळेत जास्त वेळ थांबून करुन घेत असत. ह्या क्लासबरोबर इंग्लिश, हिंदी, ड्रॉईंगच्या शाला-बाह्य परिक्षांसाठी त्या-त्या विषयांच्या विषय शिक्षकांवर शाळेत क्लास घ्यायची, जबाबदारी टाकली जायची. सर्व शिक्षक सुट्टीच्या दिवशी तसेच लवकर शाळेत येऊन हे काम निष्ठेने पार पाडायचे. मुख्य म्हणजे ह्या क्लासला कोणतीही फी आकारली जायची नाही. बाहेरच्या जगातील परिक्षा नुसत्या पास होऊन चालायचे नाही. प्रत्येक विद्यार्थिनीचे व त्याबरोबर वर्गाचे  percentage वाढले पाहिजे. ह्यावर आमच्या मोठ्या बाईंच्या कटाक्ष असे. आमच्या विद्यार्थिनी बाह्य विश्वातील यश स्व-मेहनतीने खेचून आणायच्या.

                       २६ जानेवारी १५ ऑगस्ट थाटात व रुबाबात साजरे व्हावयाचे. सर्व शाळांची पोलीस-परेड ग्राऊंडवर २ आठवडे आधी एकत्रित तालीम चालायची. सर्वांचा गणवेश स्वच्छ पाहिजे. हिरवा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज, लाल रिबीनींनी वर बांधलेल्या दोन वेण्या हा ग. . चा गणवेश. शालेय गणवेशाचे वार – ‘सोमवार, बुधवार, शनिवार’. ज्या मुलींकडे एकच गणवेश असेल, त्यांना तो

धुऊन वाळवून घालता यावा, हा उदात्त हेतू. वाढदिवसाच्या दिवशी गणवेश न घालण्याची मुभा होती. राष्ट्रीय सणांना ५वी ते ११वी सहभाग असावा, ही मोठ्याबाईंची अपेक्षा असे. हजेरी घेतली जात असे. अनुपस्थित राहिल्यास, पालकांच्या चिठ्या आणल्या पाहिजेत; ही शिस्त. शालेय जीवनांत राष्ट्रीयतेची जाणीव असावी, हा मोठ्या बाईंचा उद्देश.

                                संक्रातीचे-शुक्रवारचे हळदकूंकू, पंढरपूरची दिंडी, स्नेहसंमेलन वगैरे विविध कार्यक्रम राबविले जायचे. शाळेत आलेल्या फ्रेंच पाहुण्यांसाठी भारतीय विवाह सोहळा, बांगला देश मुक्ती युद्धाच्या नकाशाच्या सहाय्याने मोठ्याबाईंनी सांगितलेल्या ताज्या युद्ध घडामोडी, मुलींनी साकारलेली शिवशाही, तसेच ऑक्रेस्ट्रा असे सेंट्रल हॉलमध्ये मुलींनी साजरे केलेले कार्यक्रम आजही आठवतात.

                             शाळेच्या वर्गाबाहेरील फलकांवर नित्य-नवीन माहिती सदैव लिहिली जायची. मुलींची शाळा असल्यामुळे होम-सायन्स, शिवण हे विषय चित्रकला-गायना इतकेच महत्वाचे मानले जायचे. संक्रान्तीचे लाडू होमसायन्स डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थिनींकडून बनविले जात. परसातील बागकाम मेथी, कोथिबींर, भाज्या वगैरेंचा छोटेखानी बाजार भरवत असे. भाजीवाल्या चिमुरड्या मुली त्याचा खूप आनंद लुटत असत. शिक्षकांच्या देखरेखीखाली स्नेहसंमेलनाचा नास्ता, होमसायन्समध्ये विद्यार्थिनी बनवायच्या;  स्वच्छ-स्वस्त-मस्तहोई.

                      हरितालिकेचे जागरण, सहली वगैरे विविध उपक्रमांमुळेभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. शाळेचे रिझल्ट चांगलेच पाहिजेत. इन्स्पेक्शन रिपोर्ट चांगलाच हवा. ही सर्व तारेवरची कसरत असे, कुरकुर करावयास जागाच नव्हती. त्यातच शाळेचा सुवर्ण-महोत्सव धुडाक्यात पार पडला. शाळेतील नावारुपाला आलेल्या माजी विद्यार्थिनींना निमंत्रणे गेलीच पण गृहिणी म्हणून वावरत असलेल्या विद्यार्थिनींची शाळेने आवर्जून आठवण  ठेवली.

                                  अशा ह्या आमच्या मुख्याध्यापिका व्यासंगी, कल्पक, शिक्षणासंबधी सखोल विचार करणाऱ्या आनंदी, उत्साही होत्या. पण त्यांना B.P.चा त्रास असल्यामुळे, काहीवेळा खूप संतापायच्या. असे हे बुद्धीमत्तेचे तेज असलेले सौंदर्य, रागाने लालेलाल झाले की, मात्र सर्वांना खूप भिती वाटायची.

                                शाळा हेच आपले घरसमजणाऱ्या सौ. आशाताई राजदेरकरबाई (मोठ्याबाई) ११ सप्टेंबर १९७५ ह्या दिवशी सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीच्या वेळी त्या खूप गहिवरुन आल्या. ‘माझी शाळाह्या भावनेने त्या शाळेत मधू-धून यावयाच्या.

                            शाळा सोडली त्यानंतर काही वर्षांनी वृद्धापकाळाने   जगाचा निरोप घेऊन दुसऱ्या जगात आपल्या कल्पना प्रत्यक्षांत राबविण्यासाठी त्या निघून गेल्या.

प्रभा आठवले

माजी शिक्षिका - . . हायस्कूल, नाशिक

क्रमशः