त्यावर्षी
माझ्याकडे ८वी डचा दांडोबा वर्ग होता. ह्या मुलींना अभ्यासात गोडी नव्हती. त्यांना कधी प्रेमाने तर कधी धाकाने शिकवावे लागे. ह्या सर्व वर्गात एकच
मुलगी आशेचा किरण होता. तिच्या वह्या व्यवस्थित, अभ्यास वेळच्या वेळी केलेला, वागणे व्यवस्थित, घटक चाचण्यात तिला चांगले मार्क्स मिळत.
पण पुढे-पुढे तिचे अभ्यासातील लक्ष उडाले की काय?
तिला संगत कोणाची लागलेली आहे का?
अशा शंका माझ्या मनात येऊ लागल्या. तिच्याकडे मी
जास्त काळजीपूर्वक पाहू लागले. मग माझ्या लक्षात आले की,
मधल्या सुट्टीनंतर
ती मुलगी वर्गात नसते. तिच्या मैत्रिणींनी सांगितले, “शाळा सुटायच्या वेळेस ती शाळेत येऊन, दप्तर घेऊन जाते.”
एके दिवशी मी तिचे दप्तर उचलून कपाटात ठेवले व कुलूप लावले. मुलींना सांगितले की, “ती आली की, मला भेटावयास सांगा.” शाळा सुटायच्यावेळी,
ती मला दप्तर मागू लागली. मी तिला विचारले,
“परवानगीशिवाय शाळा सोडून कुठे गेली होतीस?” आधी ती दाद देईना. आवाज चढवल्यावर
तिने सांगितले, “मावशीकडे”. “कुठली मावशी?”
तिने दिलेले उत्तर ऐकून, मला गरगरायला लागले.
तिची ती रस्त्यात ओळख झालेली मावशी, वेश्या वस्तीत रहात होती. निरागसपणे ती मुलगी मला सांगत होती,”ती मावशी मला बोलावते.
खाऊ देते. खूप लाड करते.
तू खूप दमतेस म्हणून तिच्या घरी झोपायला देते.” मुलीचे वय १३-१४ वर्षाचे रंग सावळा पण चेहरा आकर्षक कोणालाही
आवडावी अशा ह्या लाघवी मुलीला; प्रेम लावून, ती बाई वाममार्गाला नेण्याच्या प्रयत्नात होती.
मी ताबडतोब
तिच्या आई-वडिलांना बोलावून सत्य परिस्थिती सांगितली.
“तिला रागावू नका नाहीतर मुलगी हातची जाईल. अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही काहीही करा पण तिचे गाव,शाळा, वातावरण सगळे बदला. प्रेमाने तिला समजावून सांगा.
तुमची मुलगी बुद्धीने हुशार आहे. तिचे आयुष्य व्यवस्थित
मार्गी लावा.”
दोन
दिवसांनी त्या मुलीचे वडिल मला हसत सांगायला आले, “बाई काही काळजी
करु नका. मी माझी बदली करवून घेतली.”
वातावरण बदलले. माझी आवडती विद्यार्थिनी सन्मार्गावर
आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, ह्याचे मला मानसिक समाधान मिळाले.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका - ग.
ग. हायस्कूल, नाशिक
क्रमशः
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात. ह्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येतील.