गृह

ग. ग. गाथा :-


. . चे संस्कार रंग :-

http://gghs-nashik.blogspot.in/2018/03/blog-post.html
----------------------------------------------------------------------------------------- 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------  

ग. ग. गवाक्ष :- 
छडी लागे छम छम, विद्या येई घमघमह्या उक्तीवर विश्वास असलेल्या येवलेकरबाईंची विद्यार्थिनींविषयी तळमळ आजही आठवते.
http://gghs-nashik.blogspot.in/2017/12/blog-post.html
------------------------------------------------------------------------------
                                        . . हायस्कूल, नाशिक येथून सेवानिवृत्त झाल्यावर प्रवचनांद्वारे धार्मिक ग्रंथ (दासबोध, भागवत) प्रचारक शिक्षिका सौ. शुभांगी जोशीबाई 
------------------------------------------------------------------------------
ग. ग. च्या मुली :-
बहरली जिथे हिरवळीत कोमल फुले।
मी फुलपाखरु झुले तिथे चिमुकले॥
अशा सार्थ शब्दात माजी मुख्याध्यापिका-मा. सरिता उजागरेबाईंनी शाळेतील शिक्षक - विद्यार्थिनी भावविश्वाचे ‘आमची वाटचाल’ हा ग. ग. चा इतिहास सांगताना, वर्णन केलेले आहे.
ग. ग. शाळेतील काही ज्ञात विद्यार्थिनींच्या नावाची कुसुमावली :-
माजी मुख्याध्यापिका - ग. ग. हायस्कूल, नाशिक
सौ. आशा राजदेरकर (कु. तारा गोरवाडकर), श्रीमती सुलोचना परभाणे

मुख्याध्यापिका
सौ. कुसुम पटवर्धन, सौ. कुसुम सातपुते, सौ. वडनगरे, सौ. लेले

अध्यापिका- ग. ग. हायस्कूल
सौ. विद्या केळकर (कु. कुसुम खरे), सौ. नलिनी लिमये (कु. यमुना जोशी)

समाजकार्य
सौ. अनुताई लिमये (कु. अनु भागवत) - प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्त्यी
शोभना रानडे (दुर्गा दांडेकर) प्रसिद्ध समाज कार्यकर्ती – Gandhi National Memorial Trust Agakhan Palace –कार्यकारी मंडळ चिटणीस व सभासद, समाज कल्याण बोर्ड सभासद.
विमल भट

सौ. सुधाताई अत्रे (माजी मुख्याध्यापिका -ग. ग. हायस्कूल, नाशिक) व आचार्य अत्रे यांच्या कन्या –  सौ. शिरीष पै (प्रसिद्ध लेखिका) व सौ. मीना देशपांडे.

कै. शांता जोग (शांता खरे)- प्रसिद्ध रंगभूमी अभिनेत्री (हिमालयाची सावली गाजलेले नाटक)

माननीय पुष्पाताई हिरे, माजी मंत्री

प्रसिद्ध गायिका मालती पांडे

डॉक्टर :- शोभा नेर्लेकर, विनया सुळे, गौरी चिटणीस, रत्ना पाटणकर, सुवर्णा बुरुड, कानिटकर

वकिल :- विभावरी शिंदेकर, नर्मदा जोशी, सिंधु औरंगाबादकर.

प्राध्यापिका :-  रत्ना हडप, आशा कुलकर्णी, (पुष्पा खरवंडीकर) रारावीकर, कर्डिले.

नृत्य:- रोशन बेदरकर

आर्किटक्ट :- हेमलता काळे, ओक
बोडस भगिनी - कुमुद, सुधा, मंदा,
लता पंडित, कुसूम सुगंधी
उषा व उत्तरा आठवले,
दांडेकर भगिनी – दुर्गा, शोभा
आपटे भगिनी- छाया, सुधा, चित्रा
स्नेहलता ओक, सुमन पुरोहित, उषा भालेराव
सुधा, शशी, सिंधु, जामखेडकर
आशा, मेधा खत्री
सुमती पाटील, साधना जोशी
सुनंदा,अनघा वाघ;
शांता, लता हिरे
निशा मोने, माधवी आठवले, प्रतिभा धोपावकर
माणिक करमरकर, सुलक्षणा ओक
नीला वैद्य, एकबोटे, नलिनी दाणी
हिरा, विजया कुलकर्णी;

अशा अनेक कितीतरी जणी जगाच्या पाठीवर आहेत.  त्यांच्याशी ह्या ब्लॉगद्वारे संपर्क झाला तर नाशिकच्या स्त्री शिक्षणक्षेत्राची गंगोत्री असलेल्या ग. ग. हायस्कूलचा इतिहास तयार होऊ शकतो.
वरील यादीमध्ये १९७० सालानंतरच्या आंतरजाल साक्षर पिढीला समाविष्ठ केलेले नाही.  १९७०सालच्या आधीच्या  विद्यार्थिनींमधील काही अपवादात्मक जणी आंतरजालावर सक्रीय आहेत. परंतु जी पिढी ह्या माध्यमापासून कैक योजने दूर आहे त्यांच्या कडून व आंतरजाल प्रणित पिढीच्या सहयोगातून तयार होणारा प्रकल्प भावी शिक्षणक्षेत्रास मार्गदर्शक ठरावा.

                     हल्लीच्या शिक्षणात काही अर्थ नाही ‘जुने ते सोने’ असे नुसते म्हणत बसण्यापेक्षा; आपल्याकडच्या आठवणी, फोटो, कविता, चित्रांकित अभिव्यक्ती ह्या द्वारे व्यक्त होण्याचा हा एक ग ग चा एकत्रित प्रयत्न.
नाशिकमध्ये ग. ग.च्या मुली म्हणून प्रसिद्ध असलेल्या विद्यार्थिनींनी  आंतरजालावर एकत्र यावे हाच ह्या प्रकल्पाचा उद्देश्य.
आपल्याला ज्ञात  असलेली नावे तसेच माहिती comment मध्ये लिहिल्यास शालेय जीवनातील मैत्रिणी एकत्र येऊ शकतील.
ग. ग. च्या विद्यार्थिनींचा G.G.Girls – Admin (Madhuri Gayawal – Sumant)हा closed group फेसबुकवर कार्यरत आहे. ह्या ग्रुपमध्ये ग. ग. विद्यार्थिनींचे  सहर्ष स्वागत.
संदर्भ :- ‘पाऊल खुणा’ हीरक महोत्सव स्मरणिका – ग. ग. हायस्कूल, नाशिक
॥ जय गुरुदेवदत्त॥





 स्वातंत्र्याची सत्तरी गाठताना
                         आज दि. १५ ऑगस्ट २०१६, भारताचा ७०वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनी शुभेच्छा देताना आठवण होते, ती शाळेतील स्वातंत्र्य दिनाची.
                 ग. ग. हायस्कूल (नाशिक) ची दगडी इमारत जशी स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांची साक्षीदार आहे, तसेच तिने पारतंत्र्याचा काळही अनुभविलेला आहे.
नाशिकमधील मौखिक इतिहासानुसार, पहिल्या महायुद्धाच्या काळात इंग्रज सरकारनी इंग्लंडमधील मुलांसाठी निवासीशाळा नाशिकला बांधली. त्याकाळी असलेले नाशिकचे थंड वातावरण इंग्रजांना मानविणारे होते. इंग्रज मुलांना नाशिक येथे हलवून त्यांच्या शिक्षणाची रहाण्याची सोय व्हावी, म्हणून ही इमारत बांधली गेली.
                           सध्या वास्तुशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेली इमारत १९१४ साली माळरानावर उभारण्यास प्रारंभ झाला.  भव्य इमारतीला लागणारा भक्कम पाया माळरानाच्या जमिनीत टिकतो का? ह्याचा इंग्रज सरकारने १ वर्षभर अभ्यास केला. जमिनीचा पक्केपणा अनुभवास आल्यानंतर, दगडी बांधकामास सुरवात झाली. शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या कामामुळे, इमारत बांधकाम पूर्ण होण्यास २ ते ३ वर्षे लागली. इमारत बांधून पूर्ण झाल्यावर १ वर्षाहून अधिक काळ  क्रीडांगणासकट इमारत इंग्रज सरकारच्या ताब्यात होती. हे क्रीडांगण गावातील मुलांच्या शाळेने इसवी सन १९०६मध्ये खेळण्याची सोय करण्याकरिता, श्रीमंत राजेबहाद्दरांच्या मालकीच्या हत्तीखाना रस्त्यालगत (सध्याचा महात्मा गांधी रस्ता- M.G.Road) दक्षिणेकडे पसरलेल्या उघड्या मैदानावरील काही जागा प्रतिमासिक ५रुपये भाड्याने घेतलेली होती.
                           आपला देश पारतंत्र्यात असल्याने, क्रीडांगण मुलांच्या शाळेला उपलब्ध न होता इंग्रज लष्कराच्या ताब्यात होते.
                                दि. २८ जुलै १९१४ रोजी सुरु झालेले महायुद्ध
दि. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी समाप्त झाले. इंग्रज मुलांना नाशिकला सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न उरला नाही. एप्रिल १९१९ सुमारास, इंग्रज सरकारने ब्रिटिश मुलांसाठी बांधलेल्या शाळेची इमारत, नाशिकमध्ये लोकसहभागातून चालू असलेल्या मुलांच्या शाळेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला.
                         शाळेला लागून असलेला, श्रीमान राजेबहाद्दरांच्या शेताचा तुकडा ३२०० रुपयांना मुलांच्या शाळेने खरेदी केला. शाळेचे हेडमास्तर श्री. रा. का. भिडे व तत्कालिन गेम्स सेक्रेटरी फडके मास्तर यांनी मैदानातील साबरीचे कुंपण, खड्डे, असंख्य वारुळे इत्यादि नष्ट केले.
                          दि. १ जुलै १९१९ रोजी लष्कराच्या ताब्यात असलेली भव्य पटांगणासकट असलेली वास्तू ‘नासिक हायस्कूल’ ह्या मुलांच्या शाळेच्या चालकांच्या ताब्यात इंग्रज सरकारने दिली.
                             इंग्रज मुलांच्या शाळेसाठी बांधलेल्या वास्तूचा सरकारी कार्यालये, लष्कर किंवा व्यापारी तत्त्वावर उपयोग न करता, देशी मुलांच्या शिक्षणासाठी केलेला उपयोग, इंग्रज साहेबाचा सुसंस्कृतपणा दाखवितो.
                        इंग्रज सरकारने बांधलेल्या ह्या इमारतीत  वर्गांच्या प्रशस्त खोल्या, सुसज्ज ड्रॉइंग हॉल व शास्त्र प्रयोगशाळा, लायब्ररीकरिता लागणारा प्रशस्त दिवाणखाना, वरच्या मजल्यावर मध्यभागी असलेले विस्तृत सभागृह (Cetral Hall ) होते.  नासिक हायस्कूल ही मुलांची शाळा स्थलांतरीत झाली. मुलांची संख्या ४७० होती.
                          मोठ्या उत्साहात मुलांची शाळा सुरु झाल्यानंतर दि.१६ जुलै १९१९ रोजी शाळाखात्याचे मुख्य मेहेरबान जे. जी. कॉव्हर्न्टन् यांच्या हस्ते इमारतीचे औपचारिक अनावरण मोठ्या थाटात झाले. ह्या समारंभाला काही  युरोपियन अधिकारी व इतर सद् गृहस्थ हजर होते.
                           शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रामचंद्र काशिनाथ भिडे होते. उद् घाटनानंतर १० दिवसांनी दि. २७ जुलै १९१९ रोजी शाळेचे संमेलन, अॅडव्होकेट कै. पी. व्ही. साठ्ये यांच्या अध्यक्षतेखाली साजरे झाले.
                             इसवी सन १९३९ साली, दुसऱ्या महायुद्धाची नांदी होईपर्यंत, मुलांचे ‘नासिक हायस्कूल’ ह्या वास्तूत बहरत होते.




                             १९३९ साली परकिय इंग्रज सरकारने ह्या इमारतीतील मुलांचे ‘नासिक हायस्कूल’ हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारी धोरणाला अनुसरुन १९४०च्या जून महिन्यापासून मुलांची शाळा बंद होऊन शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर मुलींच्या प्राथमिक ट्रेनिंग कॉलेजचे दोन वर्ग भरु लागले. आदल्या वर्षी १९३९ जून मध्ये मुलींच्या ए. व्ही. स्कूलचे दोन वर्ग (६वी व ७वी इयत्ता) राजेबहाद्दर वाड्यातून ह्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आलेली होती. १९४० साली उरलेली संपूर्ण मुलींची ए. व्ही. स्कूल स्थलांतर करुन मुलींच्या शाळेचे गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल नामकरण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुधाताई अत्रे (कै. आचार्य अत्रे यांच्या पत्नी व आदरणीय शिरीष  पै यांच्या मातोश्री) होत्या. आदरणीय शिरीष  पै ह्या आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
                         १९४५ साली दुसरे महायुद्ध संपले. इंग्रज साम्राजाच्या अस्त झाला. दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन ग ग हायस्कूलने मोठ्या उत्साहात साजरा केला.
                            आमच्या शाळेच्या माजी शिक्षिका सौ विद्याताई केळकर (आमच्या लाडक्या मोठ्या केळकर बाई) ह्या ग. ग. हायस्कूलच्या १५ ऑगस्ट १९४७ सालातील हुशार माजी विद्यार्थिनी कु. कुसुम खरे होत.
केळकरबाईंनी शाळेच्या ‘पाऊलखुणा’ ह्या रजत महोत्सवी अंकात माझी शाळा ह्या लेखाद्वारे शाळेच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची आठवण जपून ठेवली आहे.
ह्या लेखात सौ. केळकर बाई लिहितात :-


‘१५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आम्ही आम्रवृक्षारोपण केले होते. तो आम्रवृक्ष बहरत असताना आम्हाला अतीव आनंद होई. मी शिक्षिका झाल्यानंतर दुर्दैवाने तो आम्रवृक्ष उन्मळून पडला.’

                        पहिला स्वातंत्र्य दिन वृक्षारोपण करुन साजरा करणाऱ्या
ग. ग.शाळेला ७०व्या स्वातंत्र्यदिनी सलाम.
संदर्भ :-
‘पाऊल खुणा’ हीरक महोत्सव स्मरणिका – ग. ग. हायस्कूल, नाशिक
विराम -  नासिक हायस्कूल स्मृतिग्रंथ

सकल मुख्य अध्यापक व शिक्षकवृंद
                                                      यांस गुरुवंदना
शालेय जीवनास दिशा देई
                   मुख्य अध्यापकरुपी नेतृत्व
नेतृत्वातून प्रकट होई
                    तयांचे कर्माधीन कर्तृत्व
कर्तृत्वास साथ  देई
                    सहकाऱ्यांचे अनुयायित्व
असे गुरुकुल धडवी
                   विद्यार्थी जगाचे व्यक्तिमत्व
गुरुवंदने व्यक्त  होई
                    विद्यार्थिनींचे अनुबंधनत्व
                                       समस्त माजी विद्यार्थिनी
                                          ग. ग. हायस्कूल, नाशिक
ग. ग. हायस्कूल : कुलवृत्तांत
१९२१ ते १९४८ कालावधीत हुजुरपागा, पुणे येथील तज्ज्ञ शिक्षकांची बदली नाशिकच्या मुलींच्या शाळेत ( Anglo Vernacular School) होत असे.
ए. व्ही. स्कूल नाशिकच्या प्रथम मुख्याध्यापिका श्रीमती पुतळाबाई पवार ह्या हुजुरपागा, पुणे ह्या शाळेतून बदली होऊन नाशिकला आल्या.
ए. व्ही. स्कूलची सुरवात फेब्रुवारी १९२१ साली साठ्ये वाडा, नाशिक येथे झाली
कालावधी
मुख्याध्यापिकेचे नाव
गुण विशेष
१९२१ – २३

श्रीमती पुतळाबाई पवार

(पहिल्या मुख्याध्यापिका- ए. व्ही. स्कूल)शाळेची सुरवात ५वी ते ७वी (तत्कालीन नाव :- १ली ते ३री)
१९२४ - २७
श्रीमती सीताबाई भागवत
ध्यापन कुशल,तल्लख बुद्धीमत्ता, प्रेमळ स्वभाव, गोड आवाज.
१९२७-२९
श्रीमती वेणूताई चौरी
विद्यार्थीनींना सतत पुढे आणण्याची तळमळ.
१९२९ -३७
श्रीमती अलूबाई दस्तूर
मुलींवर उत्तम संस्कार घडविणारे उमदे, तत्वनिष्ठचे व्यक्तीमत्व
१९३७-३८
कु. माणिकबाई शिंदे
ए. व्ही. स्कूल व ट्रेनिंग कॉलेजच्या प्रमुख. विद्यादानासाठी समर्पित जीवन.
१९३८-३९
श्रीमती गोखलेबाई
विविध उपक्रमांद्वारे शाळेची परंपरा जोपासली.
१९३९-४३
कु. माणिकबाई शिंदे
दुसऱ्यांदा मुख्याध्यापिका
विद्यादानासाठी समर्पित जीवन
१९४०सालीध्याच्या दगडी इमारतीत भरणारी मुलांची शाळा विराम पावून,
पाटणकर वाड्यात भरणाऱ्या मुलींच्या शाळेचे ह्या जागेत स्थलांतर व मुलींच्या शाळेचे नामकरण Government Girls’ High School.
१९४३-४८
सौ. सुधाताई अत्रे
अतिशय शिस्तप्रिय,व्यवस्थितपणा व सौंदर्यदृष्टी असलेले व्यक्तिमत्व काव्याची अत्यंत आवड
१९४९ साली अहमदनगरच्या ग. ग. हायस्कूल येथील श्रीमती वैद्य बाईंची नाशिकला बदली होऊन, पुणे येथील हुजुरपागा शाळेतून तज्ज्ञ  शिक्षकांची नाशिकच्या मुलींच्या शाळेत  बदली होण्याची परंपरा खंडित झाली.
१९४९ - ५०
श्रीमती वैद्य
साधी नीटनेटकी रहाणी, शिस्तप्रिय वेळेचे बंन पाळणारे व्यक्तीमत्व. बागकाम, शेतीकाम, गणित, गृहशास्त्र, समाजकार्य, साक्षरता प्रसार या गोष्टींची आवड
१९५०-५२
श्रीमती मैत्रयी विनोद
गणित, संस्कृत विषयांची विशेष आवड
१९५२-५३
श्रीमती वागळे
हाताखालच्या स्टाफशी सहृदयतेने   वागून स्टाफच्या अडचणी विशेष लक्ष घालून दूर करणारे व्यक्तीमत्व.
१९५३-५५
सौ. अलूबाई झाईवाला
इंग्रजीवर प्रभुत्व, ऑफिसकामाची उत्तम माहिती. शिस्तीच्या बडग्याविना अत्यंत खेळीमेळीने, आपुलकीने वागणारे, निर्भय व्यक्तीमत्व.
१९५५-५६
श्रीमती शांताबाई काळे
स्व प्रयत्नातून शाळेला टेलिफोनची सुविधा प्राप्त करुन देणारे रसिक गुणज्ञ व्यक्तिमत्व.नाट्याची आवड, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणाऱ्या इतिहास तज्ज्ञ शिक्षिका.
१९५६-५८
श्रीमती वत्सलाताई भाटे
विद्यार्थिनींचे सामान्यज्ञान व सौंदर्यदृष्टी वाढविण्यासाठी विविध उपक्रम. शिक्षकांशी मैत्रीचे संबंध जोपसणारे रसिक व्यक्तिमत्व
१९५८-६०
सौ. भानुमति शर्मा
गृहशास्त्र विषयक पुस्तके प्रकाशित. मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू अशा अनेक भाषा येणारे गुणग्राहक व्यक्तिमत्व.
१९६०-६२
सौ. डेंगळे
प्रत्येक व्यक्तीच्या गुणांचा योग्य उपयोग करणारे प्रेमळ कर्तबगार व्यक्तिमत्व.
१९६२-६४
श्रीमती सुलोचना परभाणे
व्यवस्थितपणा, सौंदर्यदृष्टी अत्यंत कष्टाळू व्यक्तिमत्व. डोंगरावढे प्रचंड काम वेळेत संपविणारे नियोजन.
ग. ग. हायस्कूलच्या लायब्ररीतील पुस्तकांची व्यवस्थित वर्गवारी करुन ग्रंथसंपदा जपणारे व्यक्तिमत्व.
मराठी व इतिहास शिकविण्याची आवड. दुसऱ्याच्या कल्पनेचे आवर्जून कौतुक करणारे मोठे मन.
१९६४-७५
सौ. आशा  राजदेरकर
इतिहास, संस्कृत, इंग्रजीवर प्रभुत्व असणारे कर्तबगार महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व. गायन व अभिनयाची उत्तम जाण. शाळा हेच स्वतःचे घर मानून काम करणारे व्यक्तिमत्व. यांच्या कारकिर्दीत शाळेतील प्रत्येक वर्गाच्या २ तुकड्या सुरु होऊन शाळेचा विस्तार झाला. इंटरकॉम ह्या तत्कालिन नव्या तंत्रज्ञानाने शाळेच्या कामकाजाचे सुलभीकरण.
१९७५-७६
श्रीमती सुशीला टिळक
लेखन वाचनाचा व्यासंग असणारे मनमोकळे, निगर्वी, व्यक्तीमत्व. मराठी विषयाची विशेष आवड.
१९७६-७८
सौ. स्मिता काकण
इतरांच्या मानाने लहान वयात मुख्याध्यापिका झालेले शांत खेळकर व्यक्तिमत्व.
१९७८-८३
श्रीमती सरिता उजागरे
चित्रकला, शिल्पकला, गायन, बाहुल्या बनविणे, ग्लास पेंटिंग,  वाचन वगैरे छंद जोपासत विद्यार्थिंनीकडून त्रिमितीदर्शक देखावे उभे करुन घेऊन ज्ञान दान करणारे व्यक्तिमत्व. गाण्यासाठी गोड आवाज व इंग्रजी शिकविण्याची विशेष आवड.
स्वप्रयत्नांतून शाळेला टी. व्ही., फ्रिज प्राप्त करुन दिला.
१९८३-८९
सौ. भावना  भार्गवे
लेखिका शिक्षणतज्ज्ञ वाचनाची आवड असणारे शिस्तप्रिय व्यक्तिमत्व.पुस्तक परिक्षण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड. यांच्या काळांत शाळेतील संगणक युगाची सुरवात.
१९९०-९७
सौ. सरस्वतीबाई मोरे
शांत निगर्वी व्यक्तिमत्व
२०००- ०३
श्रीमती शैलजा गोळे
 मराठीवर प्रभुत्व असणारे गुणग्राहक, साधे व्यक्तिमत्व.
२००६-०८
श्री. शशिकांत हिंगोणेकर
स्वतः कवी असलेल्या सरांनी शाळेतील विद्यार्थिनींना कविता लेखनास उद्युत केले. शाळेच्या १००वर्ष जुन्या वाचनालयाचा विद्यार्थिनींनी उपयोग करावा म्हणून प्रयत्न केले.
२००९ - ११
सौ. पुष्पावती गीते
कोणत्याही कामांत सकारात्मक दृष्टीकोन रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रचार शाळा ही कर्मभूमी मानणारे व्यक्तिमत्व.शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण करताना मूळ स्वरुप तसेच ठेवावे, ह्यासाठी प्रयत्नशील.
२०१३पासून सध्या कार्यरत  
सौ. ज्योती चौधरी
शांत,समंजस सर्वांना बरोबर घेऊन   चालणारे व्यक्तिमत्व. यांच्या कारकिर्दीत शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण संपन्न.

संदर्भ -
१)    “पाऊल खुणा” - हीरक महोत्सव स्मरणिका
                    (१९२१ ते १९८१)
               --------- शासकीय माध्यमिक कन्या शाळा नासिक
     २) अभ्यासपूर्ण ग. ग. हायस्कूल नाशिक इतिहास संकलन
                          ---- श्रीमती पुष्पावती गीते
                                   (माजी मुख्याध्यापिका- ग. ग हायस्कूल, नासिक)

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात. ह्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येतील.