Sunday, December 30, 2018

नवी विटी - राज्य तेच


                          मोठ्याबाई (सौ.आशाताई राजदेरकर) दि. ११ सप्टेंबर १९७५ रोजी सेवानिवृत्त झाल्या आणि आमच्या ग. . शाळेवरील ११ वर्षांचा एक छत्री अंमल संपला. ह्या ११ वर्षांच्या सलग कारकिर्दीत राजदेरकरबाईंनी माझी शाळाह्या भावनेतून ग. .ला सतत नंबर१वर ठेवले. राजदेरकरबाई तसेच त्यानंतर आलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी शाळेच्या शिस्तीत कोणतेच बदल न करता, आपल्या नव-नवीन कल्पनांनी शालेय कामकाजात र टाकली.

                          खाजगी शाळांप्रमाणे आमच्या सरकारी शाळेत शिक्षकवृन्दातून मुख्याध्यापक पदोन्नती मिळत नाही. शासकीय व्यवस्थापनात खो-खो चा खेळ चालू असतो. राज्य सरकारच्या यादीतील सेवाज्येष्टतेनुसार आमच्या शाळेत मुख्याध्यापिकांची नेमणूक होत असते. शासकीय खो-खोच्या खेळांत खूपदा आमच्या शाळेतील मुख्याध्यापिकेची जागा रिकामी  असे. शाळेच्या कामकाजात ह्या गोष्टीची उणीव कधीभासू न देण्याचे इंद्रनुष्य पेलले होते; आमच्या सुपरवायझर असलेल्या सौ. शुभांगी (श्रद्धा) जोशीबाईंनी.  

सौ. आशाताई राजदेरकरबाई सेवानिवृत्त झाल्यावर, . .ला लाभले; अतिशय व्यासंगी, हुशार, विद्वान व्यक्तिमत्त्व. . .च्या मुख्याध्यापिका पदी रुजू झालेल्या श्रीमती सुशिला टिळकबाईंचा वेद, उपनिषदे ह्यांचा गाढा अभ्यास होता. सखोल अभ्यास करुन सेंट्रल हॉलमध्ये विविध विषयांची माहिती सांगायच्या. त्यांच्या भाषणांतून खूप काही शिकायला मिळायचे. विषयाशी एकरुप होऊन पोटतिडकीने बोलताना, त्यांचा आवाज त्यांच्याही नकळत इतका मोठा व्हायचा की, माईकलाही रजा घ्यायला हरकत नाही ! हा गमतीचा भाग सोडला तरी एकला चलो रेअसलेल्या ह्या व्यक्तिमत्वास आपला ठसा शाळेवर उमटविण्यास शासनाने वेळच दिला नाही. त्यांच्या अल्प-कालावधीत आमची ५ ते १०वी ची शाळा व नुकतेच सुरु झालेल्या ज्युनिअर कॉलेजची ११वी (शास्त्र, कला,वाणिज्य) व्यवस्थित वाटचाल करीत होती. ११वीची एक विद्यार्थिनी ऐन वार्षिक परीक्षेच्यावेळी आजारी पडली. टिळकबाईंनी जून महिन्यात ह्या विद्यार्थिनीची रीतसर परिक्षा घेतली. एका विद्यार्थिनीसाठी सर्व विषय शिक्षकांनी आपआपल्या विषयांचे पेपर काढले. तिच्या उत्तरपत्रिका तपासून तिला ११वी पास झाल्याची गुणपत्रिका दिली. टिळकबाईंच्या ह्या निर्णयामुळे ह्या विद्यार्थिनीचे वर्ष वाया गेले नाही. टिळकबाईंची लगेचच बदली झाली आणि सौ जोशीबाईंच्या नेतृत्वाखाली आमची शाळा नदीच्या प्रवाहाप्रमाणे दिमाखात वाटचाल करीत राहिली.

                      काही महिन्यांनी अतिशय तरुण, छोटीशी सावळी  मुर्ती मुख्याध्यापिकेच्या जागेवर विराजमान झाली. Direct Recruit झालेल्या सौ. काकणबाई स्वभावाने अतिशय शांत व्यक्तिमत्त्व. कुणाशीही वाईटपणा न घेणाऱ्या ह्या बाईंनी शाळेच्या व्यवस्थापनांत कोणतेच बदल केले नाहीत. शिस्तप्रिय सुपरवायर बाई (सौ. जोशीबाई)काटेकोरपणे शाळा सांभाळत होत्या. शाळेचा प्रत्येक घटक आपली जबाबदारी ओळखून काम करीत होता. सौ. काकणबाईंच्या कारर्किदीत शाळा दिमाखात चालू असताना, राज्यातील शिक्षकांचा मोठा संप झाला. आम्ही सर्व शिक्षक संपावर गेलो होतो. शाळेची सहल बडोदा, अहमदाबाद वगैरे गुजराथमधील ठिकाणी जाणार होती. एक दिवस काकणबाईंचा मला घरी निरोप आला. मुलींची जबाबदारी असल्याने, तुम्ही गुजराथ सहलीला जाण्यास तयार असाल तर शाळेची सहल जाईल अन्यथा ही सहल मी रद्द करणार आहे. शिक्षक-संपातून बाहेर न पडता, शाळेच्या गुजराथ सहलीची जबाबदारी मी पूर्ण केली. जहाजाच्या कप्तानाप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिकेला शाळेची जबाबदारी घ्यावी लागते, हेच खरे.

                    अल्पावधीत सौ. काकणबाईंची बदली होऊन शाळेचा चार्ज खालच्या मजल्यावर असलेल्या ट्रेनिंग कॉलेजच्या प्रिन्सिपॉलबाईंकडे गेला. दोन ठिकाणचा चार्ज सांभाळताना, त्यांनीही शाळेच्या व्यवस्थापनात कोणतेच बदल केले नाहीत. सौ. जोशीबाई आमच्या शाळेची नौका व्यवस्थित वल्हवित होत्या. ह्या प्रिन्सिपॉलबा ईंची बदली झाली. बरेच महिने आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका पद रिकामे होते.

                    जागतिक किर्तीचे गणित तज्ज्ञ श्री. जयंतराव नारळीकर ह्यांचे गावातील एच. पी. टी. कॉलेजमध्ये व्याख्यान होते. सर्व शाळेतील विद्यार्थी हे भाषण ऐकायला कॉलेजमध्ये गेले होते. आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना घेऊन आम्ही सर्व शिक्षिका व शिक्षक ह्या व्याख्यानाला गेलो होतो. व्याख्यान कळण्याइतपत शालेय विद्यार्थ्यांचे वय नव्हते, परंतु जागतिक किर्तीचे एक महान व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष पहायला मिळाले. व्याख्यान संपल्यावर, दिडच्या सुमारास आम्ही सर्वजण शाळेत परत आलो. आल्या-आल्या बातमी मिळाली की, नव्या मुख्याध्यापिका शाळेत हजर झालेल्या आहेत.

                  नव्या मुख्याध्यापिकाबाईंचे आज आगमन आहे’, हे आमच्यापैकी कोणालाच माहित नव्हते. शाळेत फक्त क्लार्क व शिपाई होते. घड्याळात ११ वाजले असताना; एक उंच, धिप्पा, चष्मा लावलेली, नीटनेटका पोशाख केलेली, केस काळेभोर, मानेवर केसांचे चक्कर त्यावर गुलाबाचे फुल, रंग काळा पण त्यांच्या चालण्याच्या रुबाबात तो झाकून गेलेला, अशी व्यक्ती जिना चढून क्लार्कच्या ऑफिसमध्ये आली. क्लार्कमंडळी पहातच राहिली, ही व्यक्ती कोण? त्या व्यक्तीने आपली ओळख दिली, “मी ह्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून शाळेत रुजू होत आहे”. क्लार्क कंपनी अंधारात होती. त्यांना कोणतीच कल्पना नव्हती; पण वेळेतच सावरुन, नमस्कार करुन, त्यांनी बा ईंना खुर्ची दिली. असा आमच्या मोठ्याबाईंचा आदरणीय सरिता उजागरेबाईंचा ग. . तील पहिला दिवस.

क्रमशः

श्रीमती प्रभा आठवले

 सेवानिवृत्त शिक्षिका,

  . . हायस्कूल, नाशिक

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात. ह्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येतील.