Sunday, December 24, 2017


कै. गवळीसर (माजी गायनशिक्षक- . . हायस्कूल, नाशिक)

                                       वेळ दुपारची होती. मला ऑफ पिरियडहोता. मी वह्या तपासत होते. इतक्यांत गवळीसरांचे आगमन झाले. टेबलाजवळच्या खुर्चीत बसत ते म्हणाले, “बाई, तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला रिटायर व्हावयास खूप अवकाश आहे, तरी प्रॉव्हिडंट फंडातून मधून मधून कर्ज काढा आणि पैसे काढून घ्या, कारणं काही द्या, नाहीतर माझ्यासारखी परिस्थिती होईल.” या वाक्याचा मला काहीच बो होईना. मी म्हणाले, “का हो सर, असं का म्हणता? काय झाले?” ते चेहरा पाडून बसले होते. ते मला म्हणाले, “बाई तुम्हाला तर माहिती मी ४ महिन्यापुर्वी सेवानिवृत्त झालो. पण मला अजून कोणतेच पैसे मिळाले नाहीत. पगार बंद झाला. मी जगावं कसं?” त्यांचे बोलणे ऐकून मला एकदम चर्र झाले. शासनाच्या काही अडचणी असतील किंवा सरांची आवश्यक कागदपत्रे पूर्ण झालेली नसतील. कारण मला माहित नाही पण घडले मात्र असे!

                              गवळीसर निर्वासित म्हणून भारतात आले, असे मी ऐकले होते. खरे खोटे मला माहित नाही. वर्ण काळा, डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा, ध्यम बांधा पण पोशाख म्हणजे पांढरा शुभ्र शर्ट व पायजमा अशी व्यक्ती सेंट्रल हॉलमध्ये पायपेटीवर बसलेली असायची.त्यातून वेगवेगळे सूर काढण्याचा उद्योग. मी नुकतीच शाळेत कामावर रुजू झाले होते.  त्या काळात गायनाची विवि वाद्यांवर विद्यार्थिनी सराव करताना, गायनाच्या हॉलमध्ये तसेच सेंट्रल हॉलमध्ये दिसायच्या. सर गायक होते तसेच उत्तम वादक असावेत. प्रार्थना सेंट्रलहॉमध्ये व्हावयाची. विवि वाद्यांचा उपयोग करुन तालासुरांत व्हावयाची, तीही गवळीसरांच्या देखरेखीखाली.

                            गवळीसर स्वतःची जात हिंदू-ख्रिश्चन सांगावयाचे. ते जन्मतः हिंदू असावेत व परिस्थितीनुसार ख्रिश्चन झाले असावेत. हिंदूंचे संस्कार ते विसरलेले नव्हते.

                             इथे एक गोष्ट नमुद करायची म्हणजे गवळीसरांच्या कोणत्यातरी नातेवाईकाची बातमी पेपरला आली होती. ह्या नातेवाईकाने मुलींच्या बाबतीत काही भानगड केली, अशी गोष्ट पेपरमधील बातमीने जगजाहीर झाली. गवळीसरांचा नातेवाईक म्हणून समाज गवळीसरांचा संशय घेऊ लागला.त्यातून आमची ग. . म्हणजे मुलींची शाळा. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘ताडीच्या झाडाखाली उभे राहिले की समाज त्या व्यक्तीकडे निराळ्या दॄष्टीने पहातो.’ मला नेहमी वाटायचे, हा गवळीसरांवर अन्याय होत आहे. गवळीसरांच्या नातेवाईकाने काही गैर कृत्य केले असेल तर त्यात गवळीसरांचा काय दोष? स्वतःची जात अभिमानाने हिंदू-ख्रिश्चन सांगणाऱ्या गवळीसरांनी, न बोलता स्वतःच्या वागणूकीतून, ‘शिक्षक-विद्यार्थिनी हे पवित्र नातेसमाजाला दाखवून दिले. समाजाचा दॄष्टीकोन आपोआप बदलला.

श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, . . हायस्कूल नाशिक

Saturday, December 2, 2017

कै. मंदा येवलेकरबाई (माजी शिक्षिका- ग. ग. हायस्कूल, नाशिक)

                             सिन्नरला आमची बस उभी होती. सहलीसाठी म्हणून येवलेकरबाईंबरोबर आम्ही २ शिक्षिका, एक शिपाई व शाळेच्या ४० विद्यार्थिनी सिन्नरला बसने गेलो होतो. खाणे, पिणे, गप्पा-गोष्टी, गाणी, काही गमतीशीर खेळ वगैरे कार्यक्रम करुन दिवसर धमाल उडवून दिली होती. सिन्नरचे हेमांडपंथी
देऊळ-गणपतीची मोठी मुर्ति असलेले देऊळ, बाजार वगैरे ठिकाणी भेटी देऊन, आता घरी परतण्याचे वे लागले होते.
                                सर्व मुलींना बसशेजारी एकत्र जमवून त्यांची हजेरी घेण्याचे काम एक शिक्षिका करत होती. ३९ मुलींनी हजेरी बरोबर दिली, पण एका मुलीचा पत्ता लागेना. ती शिक्षिका पुन्हा - पुन्हा हजेरी घेत होती. मुली मोजत होती, पण प्रत्येकवेळी एक मुलगी कमी. हे लक्षात आल्यावर आम्ही सर्व शिक्षिका घाबरुन गेलो. सहलीत सर्व मुलींना बरोबर नेणे व सुखरुप परत आणणे ही शिक्षकांची जबाबदारी असते. ही मुलगी गेली कुठे? हिला शोधायचे कुठे? आणि कसे? गांव विशेष परिचयाचे नाही. रस्ते माहित नाहीत. प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. मग आठवले सहलीला निघण्याच्यावेळी एक मुलगी म्हणत होती, “सहल संपल्यावर मी आजीकडे जाणार आहे. मला आजीकडे जाऊ द्या.” आम्ही तिला सांगितले की, “पालकांची तशी चिठ्ठी पाहिजे. तुला न्यावयास कोण येणार? ते आम्हाला कळले व आमची खात्री पटली तर आम्ही तुला आजीकडे जाऊ देऊ.” नेमकी हिच मुलगी हरवली होती. आम्हाला वाटले की, आम्ही तिला जाऊ देत नाही म्हणून आमची सर्वांची नजर चुकवून ही मुलगी आजीकडे गेली की काय? तिच्या आजीचे नाव आम्हाला माहित नाही, कुठे रहाते? माहित नाही, आता पंचाईत झाली.
                                      शेवटी सर्वांनी ठरविले, प्रत्येकानी एकेका दिशेला जायचे व तिला शोधून काढायचे. आम्हा शिक्षकांची व शिपायाची शो मोहिम सुरु झाली. खूप शो घेतला, मुलगी काही सापडेना. आता रात्र होऊ लागली पण मुलीला घेतल्याशिवाय परत जाणे, शक्य नव्हते. काय करावे? काही सुचेना.
इतक्यात आमच्या येवलेकरबाई त्या मुलीला बकोटीला धरुन,रागवत दरादरा ओढत, बसपाशी आल्या. त्या मुलीला पाहून आम्ही सर्वांनी सुस्कारा सोडला. मुलगी सापडल्याचा आनंद झाला.
                              चौकशी केल्यावर समजले की, ती मुलगी बस स्टॉपच्या पाठीमागे लपून बसली होती. बस सुटण्याची वाट पहात होती. बस निघून गेल्यावर ती आजीकडे पळणार होती. बालमनच ते! आजीकडे जाण्याची ओढ. पुढील परिणामांची तिला काहीच कल्पना नव्हती. मुलगी सापडली पण येवलेकरबाईंचा रागाचा पारा काही खाली यावयास तयार नाही. रागाने नुसत्या लाल झाल्या होत्या. तिच्यावर त्या ओरडत होत्या, त्यांना शांत करता-करता मुष्कील. शेवटी त्या शांत झाल्या, बस सुरु झाली.
                            आमच्या येवलेकरबाई तशा स्वभावाने मनमिळावू पण काही वावगे घडलेले त्यांना चालत नसे. त्यांना कसेही वागलेले आवडत नसे. अतिशय रागावत. त्यांच्या रागाची आम्हा सर्वांना अतिशय धास्तीच असे.
                             येवलेकरबाई बेताची उंची, शरीराने अतिशय रोड, कपड्यांच्या बाबतीत थोड्या निष्काळजी, केस विरळ व पाठीवर रुळणारी छोटी वेणी. ‘व्यक्ति अशक्त पण कामाचा उत्साह सशक्तअशी हे ग. .ची माजी विद्यार्थिनी असलेले  व्यक्तिमत्व शाळेच्या वास्तूत सतत कार्यमग्न असे.
                             अशक्त तब्येतीमुळे त्यांना नेहमी काहीतरी होत असावयाचे, पण कामाचा उरक दांडगा, विषयाचे पूर्ण ज्ञान असल्यामुळे शिकवणे उत्तम. वाचन दांडगे. शाळेतील १००वर्षे जुने असलेले वाचनालय त्या सांभाळायच्या. मुलींनी उत्तम पुस्तके वाचावीत व ज्ञान मिळवावे, याकडे त्यांचा कल. त्या किंचित कवी ही होत्या. कोणताही प्रसंग त्या काव्यबद्ध करीत असतगाईडच्या कॅम्पमध्ये मुलींनी लाटलेल्या पोळ्यांवर त्यांची विनोदी कविता हजर. साधी रहाणी, उच्च विचारसरणी हा त्यांच्या जीवनाचा गाभा. मुलींना शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असत. जणू शिक्षक म्हणूनच त्या जन्माला आल्या होत्या. शाळेतील मुलींना व नातेवाईकांच्या मुलांना शिकण्यासाठी त्या मदत करित असत. त्यांच्या बोलण्यातून, चालण्यातून, आचार-विचारातून शिक्षकी पेशा डोकावत असे.
अशा Born Teacher असलेल्या येवलेकरबाई ग. .च्या स्मृती पटलावर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून अनंतात विलीन झाल्या.
श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, . . हायस्कूल नाशिक