Saturday, October 28, 2017

सौ. वसुमती देशपांडेबाई (माजी सुपरवायझर, ग. ग. हायस्कूल, नाशिक)


                             एक वेळ घड्याळ चुकेल पण देशपांडेबाईंचे शिकविणे वेळेतच सुरु होणारइंग्रजी शिकवितानात्या नेहमी सांगायचा “कामात बदल हिच विश्रांती.” आम्हा विद्यार्थिनींना विश्रांतीचे हे गौडबंगाल!’ त्या काळात कधीच समजले नाहीपण आजच्या इंटरनेट जमान्यात यंत्रांच्या सहाय्याने यंत्रवत कामे करतानामाननीय देशपांडेबाईंचे म्हणण्याचा अनुभव पदोपदी येतो.
                      Time is Money हे स्वतःच्या आचार-विचारांतून  शिकविणाऱ्या ग. . हायस्कूल- नाशिकच्या माजी पर्यवेक्षिका आदरणीय वसुमती देशपांडेबाई.






Friday, October 20, 2017

नेपाळ सहल (दिवाळी दि. २१ ऑक्टोबर १९८९) :-

                             दि. २१ ऑक्टोबर १९८९ रोजी नाशिकमधील काही हौशी मंडळी देशाटनासाठी चालली होती. आगगाडी झुकझुक आवाज करीत धावत होती. त्या तालावर उत्स्फूर्त शब्दांची गुंफण होत होती, त्यातूनच सहलीचे काव्यात्मक वर्णन साकार करण्याचा अल्पसा प्रयत्न :-
एक होता गाव पण त्यात नव्हत्या बारा भानगडी
गावाचे नाव होते नाशिक
सगळेच होते मराठी भाषिक
आली आली दिवाळीची सुट्टी
दैनंदिन कार्यक्रमाला दिली बुट्टी
नेपाळ सहलीची निघाली टूम
जाण्यासाठी सगळ्यांची झाली धू
आले आले आढावसर
जमा झाले सर्व रा
जागेसाठी लावा नंबर
पैसे काढा शंर शं
पुढाकार घेण्यात अग्रेसर पंडित
त्याविना सहलीचा आनंद होईल खंडित
यात्रेठिकाणी हवा पुजारी
पुजाअर्चा यथासांग होईल सारी
वैद्याची औषधे अन् डॉक्टरचा सल्ला
गाठायचा होता लांबचा पल्ला
कुलकर्णी, परांडेकर, गोरवाडकरची गर्दी
देवाने लावली अचानक वर्दी
चटण्या-लोणची सुपारीच्या बाटल्या
कपभांड्यासह हजर झाल्या ताटल्या
इतक्यात काही तरी आठवले
सरबताला कोणी नाही विसरले
सामानासकट स्टेशनवर हजर झाली सारी
वेळ जाण्यासाठी गप्पा मारती भारी
सहलीत सामील झाले बॅन्क मॅनेजर
बर झाल ती नव्हती पॅसेन्जर
पॅसेन्जरचा रुटूखुटू प्रवास
सर्वांनाच जाणवला असता त्रास
प्रवासात बहुतेक सारे शिक्षक
त्यांना समजतात भावी पिढीचे रक्षक
त्यांच्यात सहभागी झाले प्रोफेसर
त्यांच्या उपस्थितीत रुन आली कसर
गाडीची वेळ झाली, वाजला भोंगा
प्रवेशासाठी सर्वांनी केला, एकच दंगा
कलकत्ता दर्शन :-
कलकत्त्यात प्रवेश केला ऐटीत
उतरताक्षणी पाय ठेवला बोटीत
कलकत्ता दर्शनासाठी केली गाडी
प्रेक्षणीय स्थळात वाटली गोडी
शहराचे आकर्षण कालिका माता
जय जगदंबेप्रसन्न हो आता
पवारला लागले दर्शनाचे वे
विलंब होताच मनी दाटला खेद
लेक-जावई, आजी-नाती, पुत्र-माता
प्रसन्नता वाटली पाहून कालीकामाता
साड्यांची खरेदी दुकानात झुंबड
वस्तूंच्या खरेदीची लागली लांबड
भुवनेश्वर कोणार्क पुरी दर्शन :-
देवदर्शनाची आली सुरसुरी
प्रवेश केला भुवनेश्वर कोणार्क पुरी
सागरदर्शन केले समुद्रस्ना
पाण्यात डुंबताना विसरलो भा
सागराची अथांगता पाण्याच्या लाटा
पाहताक्षणी लोप होतो मानवाचा ताठा
मानवाची पाच बोटे दोन हात
त्यांनी केली निसर्गावर मात
कलेचे वरदान भेद नाही जातपात
कलास्वादाने दिली आनंदाला साथ
दगडाच्या मुर्ती, धातूच्या मुर्ती
पण त्यांनी पसरवली भारतीय किर्ती
नेपाळ दर्शन :-
हसत नाचत आली-आली दिवाळी
यात्रिकांचा थवा चालला नेपाळी
प्रवासी चालले, हंसत खुषीत
नेपाळ विसावे, हिमालयाच्या कुशीत
पर्वतराजींचे निसर्गसौंदर्य न्याहळता
प्रवास संपला पाहता-पाहता
पशुपतीनाथाचे नयन मनोहर ध्या
नतमस्तक होती, महान-सान
मोती,रुद्राक्ष विवि दुकाने थाटली
स्वस्त दराने वस्तू घेता, मजा वाटली
वस्तूंचे वाढता वाढता, वाढीले ओझे
मन सांगे, हे सर्व माझे माझे
काशी दर्शन :-
माझे मी पण सारे विसरावे
विश्वेश्वराठायी नत मस्तक व्हावे
काशीस जावे नित्य वदावे
गंगास्नान करुन ईशरुप पहावे
अलाहाबाद :_
नौकानयन अलाहाबाद संगमी स्ना
शुचिर्भूत होऊन पहावे, विश्वकर्त्याचे ध्यान
ईशचरणी लाभावी, मनःशान्ती
वेड्या मना का बाळगशी अशान्ती
नाशिक परतीचा प्रवास :-
परतीच्या मार्गी घराची लागली आस
मन वढाय वढाय न सुटती वपाश
पर्यटन करुनी उपभोगिला आनंद
वेड्या मना, जपून ठेव हा स्मृति गं

प्रभा आठवले (माजी शिक्षिका- . . हायस्कूल)
ता. .:- ‘. . गाथाह्या लेख मालेत समाविष्ट करण्यासाठी आपण आपल्या आठवणी gurucharitra52@gmail.com वर मेल कराव्या ही विनंति.