Saturday, March 18, 2017
Sunday, March 5, 2017
माझे श्रद्धास्थान - शेलारबाई
९ वी च्या आमच्या वर्ग
शिक्षिका देशमुख बाई म्हणजेच शेलार बाई यांच्या बरोबर असलेला हा आमच्या वर्गाचा
फोटो म्हणजे माझ्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे.
बाई शाळेत रुजू झाल्या तेंव्हा
मला वाटतं, सगळ्या शिक्षकांमध्ये वयाने लहान होत्या. अगदी
चापून चोपून साडी नेसायच्या म्हणून “बाई” वाटायच्या!
‘गणित आणि विज्ञान’ हे नेहमीचे भालदार-चोपदर
गुणांची वाट अडवायला तत्पर असणारे विषय, पण बाईंच्या
शिकवण्याच्या हातोटीमुळे नववी आणि दहावीत या भालदार-चोपदरांची नजर चुकवून चांगले
गुण मिळवण्यात मी यशस्वी झाले.
गेल्या ३/४ वर्षात फेसबुक आणि व्हॉटस्-अॅप
क्रांतीमुळे बऱ्याच
शाळामैत्रिणींशी पुन्हा संपर्क झाला. त्यांच्या कडून समजलं की बाई २०१४ च्या आसपास
निवृत्त झाल्या. शाळेचे शैक्षणिक सत्र संपायच्या आधीच त्या निवृत्त झाल्या, पण मुलींचे नुकसान नको म्हणून त्यांनी १०वीच्या मुलींसाठी निवृत्तीनंतरही
पूर्ण सत्र शिकवले.
शिकवण्याची जी तळमळ आम्ही
त्यांच्या पंचविशीत अनुभवली तीच तळमळ साठाव्या वर्षीही तशीच आहे, हे ऐकून अतिशय आनंद झाला आणि स्वत:च्याच भाग्याचा हेवा वाटला की असे
शिक्षक आपल्याला लाभले. शेलारबाईंना माझे शतश: प्रणाम!!!
‘ लाभले आम्हास भाग्य,
ग. ग. ने
घडविले बालपण
जाहले जीवन धन्य,
शिकविण्यास होते असे गुरुजन’
मंजिरी
सुमंत – चौधरी
माजी विद्यार्थिनी,
ग. ग. हायस्कूल
(१९८०
सालची १०वी पास )
Subscribe to:
Posts (Atom)